+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Apr 24 person by visibility 329 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर कोटीतीर्थ येथून होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅन, रिक्षा आदी प्रचार वाहनांचे पूजन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
  क्षीरसागर म्हणाले, "महायुती शिवसेनेचे उमेदवार मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार समस्त शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरात रविवारपासून अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅन, २२ ठिकाणी सभा, सुमारे २५ प्रचार फेऱ्या, ७५ हून अधिक ठिकाणी मिसळ पे चर्चा, व्यक्तिगत भेटी गाठी, मॉर्निंग वॉक भेटीगाठी, पॅम्प्लेट वाटप, पथनाट्य व वासुदेव यांच्यामार्फत प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅनद्वारे शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे लोकहिताचे काम, महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेला निधी, शिवसेनेचे सामाजिक काम यांच्या चित्रफिती प्रसारित केल्या जाणार आहेत. 
 प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर कोटीतीर्थ मंदिर - मातंग वसाहत- राजारामपुरी बस रूट - मारुती मंदिर - मेन रोड - जनता बझार अशी प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यासह कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा अमृतसिद्धी हॉल कळंबा येथे सायंकाळी सहा वाजता पार पडणार असल्याची माहिती  क्षीरसागर यांनी दिली.