कोल्हापुरात शनिवारी ब्राह्मण गोलमेज परिषद
schedule30 Jun 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेतर्फे शनिवारी, चार जुलै २०२६ रोजी कोल्हापुरात ब्राह्मण गोलमेज परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नासंबंधी विचार मंथन करण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी दिली. हॉटेल ओपल येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत परिषद होणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेत ब्राह्मण समाजातील रखडलेले प्रश्न , सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक विषयांवर भूमिका ठरविली जाणार आहे. परिषदेच्या पहिल्या सत्रात ब्राह्मण समाजाची सद्यस्थिती, सामाजिक विषय पुरोहितांचे प्रश्न, संघटनात्मक समन्वय या विषयांवर चर्चा होईल. दुसऱ्या सत्रात अमृत संस्था, परशुराम आर्थिक विकास महामंडळ याचे कार्य सद्यस्थिती याबाबत उहापोह केला जाईल.समाजाच्या प्रश्नासंबंधी मुक्त चर्चा होणार आहे. समाजाशी निगडीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातील ब्राह्मण संघटना संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रदीप अष्टेकर, अजित देशपांडे, सूरज कुलकर्णी आदी उपस्थित होते.