Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा, भाापकडील ठरावांची संख्या १४५५कोल्हापुरात शनिवारी ब्राह्मण गोलमेज परिषदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा,  सेवा समायोजनाच मार्ग मोकळाकाँग्रेसकडे 1851 ठराव, गोकुळच्या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार- सतेज पाटीलसांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिकाविवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा, भाापकडील ठरावांची संख्या १४५५

schedule30 Jun 26 person by visibility 10 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रकियेंतर्गत . शिरोळ तालुक्यातील तब्बल २५ दूध संस्था प्रतिनिधींनी आपले ठराव भारतीय जनता पक्षाकडे सुपूर्द केले. माजी आमदार महादेवरावजी महाडिक आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी केलेल्या पारदर्शी कारभारामुळे हे ठराव सुपूर्द करत असल्याचे सांगितले. शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांनी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक विजयेन्द्र माने यांच्याकडे हे ठराव दिले.

 सोमवारी महायुतीतील आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने ठराव धारकांचा मेळावा घेऊन तब्बल १४३० ठराव सहाय्यक निबंधकांकडे सादर केले होते. या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक आणि गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी अजूनही जिल्ह्यातील बऱ्याच दूध संस्था भाजप महायुती सोबत येणार असल्याचे सुतोवाच केले होते याचाच प्रत्यय आज आलातत्पूर्वी शितल गतारे यांच्या नेतृत्वाखाली ठरावधारकांनी राजाराम कारखाना येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील बहुतांश दूध संस्था भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असल्याचे अभिवचन दिले.  या ठरावांमुळे भारतीय जनता पक्षाच्या ठरावांची संख्या १४५५ इतकी झाली असून या संख्येत आणखी वाढ होण्याचा विश्वास माजी आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes