ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या- संदीप गादिया
schedule16 Sep 23 person by visibility 410 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
ओटीपी न देताही हॅकर्स तुमच्या खात्यातील पैसे हडपू शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार कमीच करा.ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या, असा सल्ला सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी दिला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि शिवाजी विद्यापीठ विधी अधिविभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मोबाईलचा वापर बंद झाल्यानंतर मोबाईल डाटा, वायफाय, ब्ल्युटुथ बंद करायला अजिबात विसरु नका. मोबाईल मध्ये देखील अँटीव्हायरस चा वापर करा. मोबाईलला नेहमी पासवर्ड ठेवा व पासवर्ड कुठेही लिहू नका अथवा कोणाला सांगू नका. मोबाईल वर येणाऱ्या मॅसेजेस मधून कशी फसवणूक केली जाते व डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड धारकास कळू न देता त्याचे स्वॅपिंग करुन कशी फसवणूक केली जाते याचे प्रात्यक्षिकाव्दारे संदीप गादिया यांनी उदाहरण देत अशा मॅसेज अथवा कॉल ला उत्तर न देता असे मॅसेजेस व कॉल्स टाळा.”
चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले.‘शिवाजी विद्यापीठातही सायबर क्राईम विषयावर वेगळा विभाग घेण्यात येईल. सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हा होणारच नाही याची दक्षता घ्यावी’ असे पाटील यांनी सांगितले. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी हे चर्चासत्राचे आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
यावळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, खजिनदार हरीभाई पटेल, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अॅड. इंद्रजित चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कायदा सल्लागार संतोष शहा, कायदा अधिकारी अनुष्का कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन चेंबरच्या संचालिका सीमा जोशी यांनी केले. शिवाजी विद्यापीठ विधि विभागाचे विभाग प्रमुख विवेक धुपदाळे यांनी मानले.