+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Mar 24 person by visibility 136 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम आणि बीजीएम संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने उत्तरेश्वर तालीम मंडळाचा ६-० असा धुव्वा उडविला. सामन्याच्या नवव्या, २४ व्या आणि ३७ व्या मिनीटाला रिबेंता मैतेयी यांनी सलग तीन गोल नोंदवत हॅटट्रिकची नोंद केली. मध्यंतरास बालगोपाल ३-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात बालगोपालच्या यशराज कांबळे, रोहित कुरणे व अक्षय सरनाईक यांनी गोल नोंदवत संघाला ६-० असा दणदणीत विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघाचा २-० अशा गोलफरकाने पराभव केला. सामन्याच्या ३० व्या मिनीटाला वेताळमाळच्या प्रणव कणसे याने तर ४३ व्या मिनीटाला आकाश माळी याने गोल नोंदविला.
सायंकाळच्या सामन्यात बीजीएम स्पोर्ट्सने काळभैरीरोड फुटबॉल क्लबचा ९ -० अशा गोलफरकाने धुव्वा उडवला. बीजीएमच्या अनिकेत जोशीने नवव्या मिनीटाला तर अदित्य साळोखेने १७ व २१ व्या मिनीटाला गोल केले. विवेक पाटीलने २७, २९ व ३९ व्या मिनीटाला सलग तीन गोल नोंदवत हॅट्ट्रिकची नोंद केली.मध्यंतरापर्यंत बीजीएमने ६-० अशी घसघशीत आघाडी घेतली होती. उत्तरार्धात अभिराज काटकरने ४७ व ५४ व्या मिनीटाला दोन गोल केले. तर वैभव राऊतने ६४ व्या गोल केला.
सामनावीर : प्रणव कणसे (वेताळमाळ तालीम), विवेक पाटील (बीजीएम स्पोर्ट्स), रिबेंता मैतेयी (बालगोपाल तालीम).
लढवय्या : शुभम आजगेकर (गडहिंग्लज स्पो.), विजय होडगे (काळभैरीरोड), स्वराज पाटील (उत्तरेश्वर तालीम)
गुरुवारचे सामने -
खंडोबा तालीम मंडळ वि. झुंजार क्लब - दुपारी २ वा.
फुलेवाडी क्रीडा मंडळ वि. संयुक्त जुना बुधवारपेठ - ४ वा.