बीएसएनएलकडून ग्राहककेंद्रित योजनांची घोषणा, एक रुपयांची फ्रीडम ऑफर
schedule15 Aug 26 person by visibility 24 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) नवीन ग्राहक केंद्रित डिजीटल उपक्रमांची घोषणा करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बीएसएनएलने एक रुपयांची ‘फ्रीडम २.०’ऑफर सुरू केली आहे. यामध्ये नवीन ग्राहकांना फक्त एक रुपयांमध्ये बीएसएनएलच्या मोबाइल नेटवर्कचा अनुभव घेता येईल.’ अशी माहिती वरिष्ठ अधिकारी अरविंद पाटील यांनी दिली. ग्राहकांना बीएसएनएलच्या सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात अनुभवता याव्यात यासाठी ही ऑफर डिझाइन केली आहे. या ऑफर अंतर्गत रोज एकजीबी डेटा, शंभर एसएमएस प्रतिदिन, अमर्यादित व्हाइस कॉल्स आणि वैधता २४ दिवस आहे. याशिवाय बीएसएनएल फायबर फ्रीडम प्लॅन प्रतिमहिना १,१११ रुपयांची योजना जाहीर केली. या व्यतिरिक्त स्वातंत्र्यदिनानिमित्त बीएसएनएलच्या २,३९९ रुपयांच्या वार्षिक प्रिपेड प्लॅनवर मर्यादित कालावधीसाठी योजना जाहीर केली आहे. या योजनेत मर्यादित कालावधीसाठी अतिरिक्त ४७ दिवसांची वैधता दिली जाते. पत्रकार परिषदेला अधिकारी दिलीप मोहिते, बी. आर. कुलकर्णी, अनिल जाधव, शिवराम कुलकर्णी आदी उपस्थित होते.