Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंकाआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाहीअधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !बीओटीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणीस विरोध, जीमच्या खासगीकरणाला ब्रेक !  मुख्यालयातील सुशोभिकरणाचा हिशेब  सदस्यांनी मांडला ! !

जाहिरात

 

विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्या

schedule14 Aug 26 person by visibility 23 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 8239 वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन ट्यूबलाईट बल्ब बसविण्यात आले आहेत विनय प्रकाशदीप योजनेअंतर्गत,  ज्या वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश नव्हता त्या ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या ट्यूबलाईटमुळे पुरेसा प्रकाश  उपलब्ध झाला आहे अशी माहिती शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांनी दिली.
 जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 1955 शाळेतील 8239 वर्ग खोल्यासाठी ही योजना लाभदायक ठरली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेला आहे या छोट्याशा प्रयत्नाचा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे. ' विद्यार्थ्यांना अंधारात नाही तर प्रकाशात आणि उज्वल भविष्यासाठी शिक्षण मिळावे ' हा या योजनेमागील प्रमुख उद्देश होता. शाळा व्यवस्थापन समिती, लोकवर्गणी यांच्या माध्यमातून ही योजना यशस्वी झाली असेही त्या म्हणाल्या पत्रकार परिषदेला प्राथमिक शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, प्रकाश मुगडे , माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व शिक्षण विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes