भाजपा उद्योग आघाडीची कोल्हापूरची कार्यकारिणीची घोषणा ! जिल्हाध्यक्षपदी भरत पाटील, शहराध्यक्षपदी धैर्यशील पाटील !!
schedule03 Aug 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खासदार धनंजय महाडिक, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची उपस्थिती होती.
नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून भरत पाटील, कोल्हापूर शहरप्रमुख धैर्यशील पाटील, शहर कार्याध्यक्ष समरजित निंबाळकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख दीपा माने, शहर महिला आघाडी प्रमुख सीमा शहा, इचलकरंजी महिला आघाडी प्रमुख कविता माने, कागल तालुका अध्यक्ष रोहन साबळे, करवीर तालुका अध्यक्ष अशोक काटकर, शाहुवाडी तालुका अध्यक्ष बी. एस. पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष सतीश जाधव, राधानगरी तालुका अध्यक्ष अनिल कातिवले, हातकणंगले तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष देवराज सुतार, आजरा तालुका अध्यक्ष निखिल पाटील, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष पृथ्वीराज तारळे, चंदगड तालुका अध्यक्ष पी. टी. पाटील आणि गगनबावडा तालुका अध्यक्ष सुरेश लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. शहर महिला आघाडी उपाध्यक्षा अश्विनी पाटील आणि जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा वेदा गांधी यांनाही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
……………
“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत', 'मेक इन इंडिया' आणि 'स्टार्टअप इंडिया' या संकल्पनांना गती देण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापूर हा पारंपरिक स्टार्टअप्स उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि उद्योगांच्या विविध समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी भाजप उद्योग आघाडीने समन्वयकाची भूमिका पार पाडावी. सरकारच्या विविध उद्योगाभिमुख योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उद्योग, अभियांत्रिकी, फाउंड्री, वस्त्रोद्योग आणि कृषीपूरक उद्योगांसाठी ओळखला जाणारा जिल्हा असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे.”
- धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार