डीवाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
schedule03 Aug 26 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : हॉस्पिटॅलिटी उद्योग हा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राकेश कुमार शर्मा यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या तसेच विद्यार्थी पालक हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला , कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले, आय क्यू ए सी संचालक डॉ शिंपा शर्मा, प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.कुलसचिव डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी देश विदेशातील करीअर संधीबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबतही त्यांनी माहिती दिली.
विद्यापीठाच्या आय क्यू ए सी संचालक डॉ शिंपा शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव यांनी केले. आभार प्रा. रोहन हवालदार यांनी मानले. यावेळी डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड मनेजमेंट चे प्राचार्य डॉ. अजित पाटील, अलायड हेल्थ सायन्स चे कोर्डीनेटर डॉ. आर एस पाटील, प्रा. रुबेन काळे, कर्मचारी, विद्यार्थी , पालक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. .