आझाद गल्ली, गुजरी कॉर्नरला मनसेची दहीहंडी जल्लोषात
schedule08 Sep 23 person by visibility 152 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आझाद गल्ली, गुजरी कार्नर येथे दहीहंडी पार पडली. शिरोळ येथील गोडी विहीर एसपी बॉईज गोविंदा पथकाने पाच थर रचत येथील दहीहंडी फोडली. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या हस्ते दहहंडी स्पर्धेचे उद्घाटन झाले. जिल्हा सचिव प्रसाद पाटील अध्यक्षस्थानी होते. या दहीहंडीचे संयोजक विजय करजगार यांनी स्वागत केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव, उद्योगपती मोहन मुल्हेरकर, संजय करजगार, रत्नदीप चोपडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, उत्तम वंदुरे आदी उपस्थित होते.