+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !!
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Apr 23 person by visibility 680 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
तक्रारदाराची चारचाकी मित्राकडून परत आणण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचुक (वय ४८ वर्षे, १६ नंबर गल्ली विजयमालानगर जयसिंगपूर जि. कोल्हापूर मूळ रा.बाडगी ता.पेठ जि.नाशिक ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार याने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन चारचाकी गाडी विकत घेतली होती. त्यानंतर ती गाडी त्याने मित्राला विकली. पण मित्राने फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते भरले नाही.त्यासाठी तक्रारदाराने मित्राकडे तगादा लावला. पण त्याने दुर्लक्ष केल्याने तक्रारदाराने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेत मित्राकडून परत गाडी मिळवून द्यावी यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अर्ज दिला. सहाय्यक फौजदार चुळचूक याने तक्रारदाराकडे गाडी परत आणण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याच्या तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक फौजदार चुळचूक याने तडजोड करून पंधरा हजारा ऐवजी दहा हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर विरोधात सापळा रचला. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयाची लाच घेताना सहाय्यक फौजदार चुळचूक याला रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पोहेकॉ विकास माने, सचिन पाटील, पो.कॉ मयूर देसाई, सुरज अपराध यांचा कारवाईत सहभाग होता.