
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्या पंचाहत्तरी निमित्त ' अमृतमहोत्सवी गौरव 'समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन,दसरा चौक या ठिकाणी या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी रसिकांच्या मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे कवी म्हणून अशोक नायगावकर सर्वपरिचित आहेत.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते नायगावकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतेज पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत. तर अशोक नायगावकर यांच्या साहित्य आणि व्यक्तिमत्त्वावर डॉ.विजय चोरमारे,डॉ. रफीक सुरज हे वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य सभेच्या वतीने करण्यात आले आहे.