ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा. सुशांत मगदूम, उपाध्यक्षपदी दत्तात्रय देशपांडे
schedule27 Sep 23 person by visibility 250 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा. सुशांत तानाजीराव मगदूम (मुरगूड), उपाध्यक्षपदी दत्तात्रय सखाराम देशपांडे (जरळी), कार्यवाहपदी भिमराव महादेव पाटील (जेऊर) यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी हिंदुराव पाटील होते.कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संचालकांची नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीत पदाधिकारी निवडी एकमताने झाल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारायण चौगुले, रंगराव तोंडले, तात्यासो पाटील, सुनील पवार, राजाराम सरनोबत, सर्जेराव पाटील, जयसिंग नाईक, गणपती चव्हाण, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.