वस्ताद बाबासाहेब तिबिले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
schedule27 May 23 person by visibility 875 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
मर्दानी खेळ व कुस्ती या खेळांचा विकास व प्रसार करणारे शिवाजी पेठेतील ज्येष्ठ वस्ताद बाबासाहेब तिबिले यांना आज शनिवारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मर्दानी कलाविशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मर्दानी कला प्रशिक्षण शिबीराच्या सांगता समारंभावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पद्माराजे गार्डन पटांगणात आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने २६ दिवसीय मर्दानी कला प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचा सांगता समारोप झाला. सांगता समारोपात शिबीरार्थींनी लाठी, लेझीम, दांडपट्टा, मल्लखांब, रोप मल्लखांब, कराटे, तलवारबाजी, जिम्नॅस्टीक, योगा यांची प्रात्यक्षिके सादर केली.
मर्दानी कलेसाठी योगदान देणार्या व्यक्तींसाठी देण्यात येणारा पहिलाच राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वस्ताद बाबासाहेब तिबीले यांना जिल्हा परीषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक सतिश गुरव, महापालिका जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक ईश्वर परमार, शिबीरप्रमुख वस्ताद पंडीत पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विक्रीकर निरीक्षक आरती शिंदे, जागतिक विक्रमवीर बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र दुर्गे, गणेश साळोखे, उमेश कोडोलीकर, विक्रम शिंदे, निखिल पोवार,अश्वम साळोखे, प्रतिक पाटील, सम्मेद देशिंगे, हर्ष शिंदे, ऋषिकेश पाटील, अतुल महेकर यांनी परिश्रम घेतले.