
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील आझाद गल्लीतील अनिरुद्ध उदय खाडे ( वय 40 ) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. कास्टको कंपनी ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (दि.२५) सकाळी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुन्या काळातील इतिहास अभ्यासक (कै.)आनंदराव खाडे यांचे ते नातू तर फाउंड्री इंडस्ट्रीतील तज्ज्ञ (कै.) अशोक उर्फ उदय खाडे यांची ते पुत्र होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.२६) सकाळी नऊ वाजता आहे.