Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !

जाहिरात

 

आर.व्हीं.चा अतिरिक्त कार्यभार काढला, डी.सी.कुंभार नवे प्रशासनाधिकारी !

schedule17 Jun 25 person by visibility 747 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातींल शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्याकडील कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आता माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार यांच्याकडे सोपविला आहे. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी मंगळवारी (१७ जून २०२५) या नियुक्तीसंबंधीच्या आदेशाची कार्यवाही झाली.  दरम्यान  प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारीपदाला पूर्णवेळ अधिकारी काही मिळाली नाही. गेली अनेक वर्षे शिक्षण समितीचा कार्यभार हा प्रभारीवरच सुरू आहे. कांबळे यांच्याकडे जुलै २०२४ मध्ये शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा कार्यभार सोपविला होता. एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच त्यांच्या काढून कार्यभार काढून घेतला. कुंभार यांच्याकडे प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी आली आहे. त्यांनी यापूर्वी २०२२-२०२३ या वर्षात प्रशासनाधिकारी म्हणून काम केले होते. दरम्यान महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या काही संघटनांनी, शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची भेट घेऊन शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदी वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी.  गटशिक्षणाधिकारी दर्जाचा सक्षम अधिकारी नेमावा अशी मागणी केली होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करत प्रशासनाधिकारीपदी वर्ग तींन दर्जाचा अधिकारी नेमला आहे. कांबळे आणि कुंभार हे दोघेही वर्ग तीन दर्जाचे अधिकारी आहेत. दरम्यान कुंभार हे २३ जुलै २०२५ रोजी प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत. कुंभार यांनी त्यांच्याकडील मूळ पदाचा कार्यभार सांभाळून प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळायचा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes