जिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबित
schedule30 Jul 26 person by visibility 83 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चार दिवसापूर्वी गगनबावडा तहसील कार्यालयाच्या इमारतीत लागलेल्या आगीवेळी आपत्ती व्यवस्थापन विभागातंर्गत नेमलेले दोन कर्मचारी गैरहजर होते. या प्रकाराची गंभीर दखर जिल्हा प्रशासनाने घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी नियुक्त गगनबावडा पंचायत समितीमधील कृषी विभागातील विस्तार अधिकारी ज्ञानदेव केदारी जाधव व पंचायत समितीकडील कनिष्ठ सहायक चंद्रकांत भिवा पाटील या दोघांना जिल्हा परिषदेने सेवेतून निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. २५ जूनच्या संध्याकाळी ते २६ जूनच्या पहाटेच्या सुमारास गगनबावडा तहसील कार्यालय इमारतीत आग लागली होती. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग अंतर्गत कामासाठी नियुक्त कर्मचारी जाधव व पाटील हे त्या ठिकाणी हजर नव्हते. या प्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्यांच्यावर २९ जुलै रोजी निलंबनाची कारवाई झाली.