Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !! खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कारवाईची मागणीयंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !! सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागरव्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवार

जाहिरात

 

शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविले

schedule07 Feb 26 person by visibility 2018 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहू मिल चौक परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात झाला. शनिवारी, सात फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव क्रेटा वाहनाने तीन दुचाकींना उडविले. क्रेटाच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. शाहू मिल चौक ते उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा थरकाप उडविणारा अपघात घडला. जखमीना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिसही घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करत आहेत. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी झाली आहे. क्रेटाने धडक दिलेली दुचाकी वाहने रस्त्याच्याकडेला पडलेली आहेत. क्रेटा हे चारचाकी वाहनही पलटी झाली आहे.या दुर्घटनेत भाग्यश्री लक्ष्मण गवळी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी कर्मचारी दिपक महादेव वंशे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes