भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात
schedule16 Aug 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हा कार्यालयात सकाळी ८ वाजता गुजरात येथे आयोजित पहिल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळविणारे रोहित दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ व राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी माजी प्रदेश सचिव महेश जाधव, ॲड. संपतराव पवार, अमर साठे, गणेश देसाई, डॉ. राजवर्धन, संदीप देसाई, भरत काळे, दिलीप मेत्राणी, माधुरी नकाते, गायत्री राऊत, रीमा पालनकर, माधवी पाटील, उमा पवार, प्रवीणचंद्र शिंदे, अशोक लोहार, मामा कोळवणकर, सयाजी आळवेकर, राजेश कोगनुळकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, देविदास अवताडे, महेश यादव, अमोल पालोजी, संदीप कुंभार, आप्पा लाड, सचिन सुराणा, झुंबरलाल गांधी, विश्वजीत पवार, भूषण कानकेकर, अनिकेत अतिग्रे, किरण कुलकर्णी, प्रशांत अवघडे, सुनीता सूर्यवंशी, विशाला कल्याणशेट्टी, संगीता काटकर, देवयानी पाटील, विद्या बनसोडे, श्रद्धा कुलकर्णी, अलका जावीर, अश्विनी वास्कर, शुभांगी चितारी, अरविंद वडगावकर, सुधीर देसाई, नजीर देसाई, तौफिक बागवान, अनिल कामत, दिलीप बोंद्रे, सुरेश गुजर, सचिन पवार, विश्वास पवार, शाहरुख गडवाले, नितीन पवार, प्रसाद पाटोळे, विवेक कोरडे, ईश्वरा पाटील, अशोक रामचंदानी उपस्थित होते.