Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉलपटूच्या उमेदवारीचे कौतुक, जवाहरनगर- सुभाषनगर परिसरात स्वागत जागतिक न्यूरोसर्जरी परिषदेत डॉ. शिवशंकर मरजकके यांच्या प्रबंधाचे कौतुक त्या दोन नेत्यांनी भूतकाळातील राजकारण उगाळण्यापेक्षा वर्तमानातील विकास स्थितीवर बोलावे - राजू मानेकोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर, राजकुमार चौगुले, राहुल गायकवाडसह सहा जणांना पुरस्कार नाळ प्रभागांशी...कामे विकासाची ! लोकसेवेत गवंडी कुटुंबीय !!जाधव कुटुंबीयांची दुसरी पिढी समाजकारण-राजकारणातप्रभागाच्या सेवेसाठी सूत्र अंगिकारुन काम करणारा लोकप्रतिनिधीविद्यार्थ्यांनो स्वप्नं पाहा, आयुष्यात मोठे व्हा : प्रा.जयसिंग सावंत प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद, तरुण उमेदवारांची वाढतेय उमेदपतीपाठोपाठ पत्नीचे निधन

जाहिरात

 

55 लाखात कारंजा, सतेज पाटलांनी खोटे बोलू नये ! पाच कोटीचा फंड देऊ, शहरातील दहा तलावात कारंजा बसवावेत- राजेश क्षीरसागरांचे खुले आव्हान

schedule04 Jan 26 person by visibility 266 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील तलावात ज्या पद्धतीचा फाउंटन म्युझिकल  कारंजा बसवला आहे त्या धरतीवर कोल्हापुरातील रंकाळा तलावात साडेतीन कोटी रुपये खर्चून फाऊटन कारंजा उभारण्यात येणार आहे. मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे  निगेटिव्ह नरेटीव सेट करण्यात पटाईत आहेत. ते 55 लाखात कारंजा तयार होतो असे खोटेनाटे सांगत आहेत. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मी त्यांना माझ्या फंडातील पाच कोटी रुपये देतो. त्या निधीतून  त्यांनी शहरातील दहा तलावात प्रत्येकी 55 लाख रुपये किमतीचे दहा कारंजा क बसवावेत. " असे खुले आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत रंकाळा तलाव येथे बसविण्यात येणाऱ्या कारंजावरून आमदार क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच माझ्यावर टीका करताना कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सत्तेत सहभागी होते याची जाणीव ठेवावी असा टोला आमदार पाटील यांनी लगावला होता. आमदार पाटील यांच्या विधानाचा क्षीरसागर यांनी चांगलाच समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले, "  कोल्हापूर महापालिकेत नाईलाज म्हणून आम्ही आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होतो. महापालिकेचा सगळा कारभार तेच करायचे. परिवहन समिती फक्त आमच्याकडे होती. दरम्यान परिवहन समितीमधील 156 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याचे पुण्य आमच्यातून घडले. ते काम पाटील यांना का सुचले नाही  तसेच महापालिकेतील 500 हून अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत केले. शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून हा निर्णय झाला. मात्र अनेक वर्ष महापालिकेत सत्तेत असलेले व मंत्रिमंडळात काम केलेल्या सतेज पाटलांना या कर्मचाऱ्यांची दुःखे दिसली नाहीत काय? असा खडा सवाल आमदार क्षीरसागर यांनी केला. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारने काय केले यासंदर्भात जाहीर चर्चा करण्यासाठी सतेज पाटील यांना आवाहन केले होते मात्र प्रत्येक वेळी ते खोटेनाटे सांगून लोकांची दिशाभूल करत असतात. निगेटिव्ह नरेटीव सेट करण्यात ते किंग आहेत. कोल्हापुरात उड्डाणपूल, आयटी पार्क, रंकाळा सुशोभीकरण  त्यांना का करता आले नाही ? त्यांनी फक्त आपला स्वतःचा विकास साधला. कॉलेजच्या जागा वाढवल्या, हॉटेलसाठी पार्किंग मिळवले. याउलट महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात सर्किट बेचची स्थापना झाली  शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर आहे. रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. येत्या आठ,  दहा दिवसात सगळी कामे होतील. शिवाय  महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर शहराची हददवाढ होणारे निश्चित आहे. कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. प्रत्येक निवडणुकीत वेगळी टॅगलाइन तयार करायची आणि लोकांच्या भावनेशी खेळायचे हा उद्योग आता फार काळ चालणार नाही. महायुतीच्या कामकाजाचे  पंचनामा काढण्यापेक्षा  पाटील यांनी आमदार व पालकमंत्री असतानाच्या कर्तव्यशून्यतेचा  लेखाजोखा मांडावा. थेट पाईपलाईन योजनेचे ते श्रेय घेतात मात्र थेट पाईपलाईन येण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यावर मी आमरण उपोषण केले होते. एखाद्या आमदाराने विधानसभेच्या पायऱ्यावर आमरण उपोषण करण्याची ही एकमेव घटना आहे. सरकारने त्या आंदोलनाची दखल घेऊन थेट पाईपलाइन योजनाला मंजुरी दिली होती हे आमदार पाटील यांनी लक्षात घ्यावे. महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 जानेवारी महायुतीचा भगवाधारी हे नवे सूत्र दिसेल. पत्रकार परिषदेला माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या  जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, विजय बलुगडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes