परमटंना ३० टक्के बोनस, टेंपररींना दिवाळीला साबणही नाही
schedule05 Dec 23 person by visibility 148 categoryराजकीय
सभासदांनी ओढले कारभाऱ्यांच्यावर चिठृठीद्वारे शाब्दिक आसूड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या नेत्यांचा चिठ्ठीद्वारे चिमटा काढला आहे. मतपत्रिकेसोबतच अनेक सभासदांनी चिठृठी टाकत कारभारी नेत्यांच्या कामकाजाचा पंचनामाही केला आहे. तसेच काही सभासदांनी के पी पाटील यांच्या कामकाजाचे कौतुकही केले आहे. उच्चांकी ऊस दरावरून सभासदांनी कौतुक केले आहे.
या निवडणुकीत परमनंट कामगारांचा बोनस, पगार हा विषय सत्ताधारी मंडळींना उचलून धरला. दुसरीकडे विरोधी आघाडीने टेंपररी कर्मचाऱ्यांच्या विषयाला हात घातला. चिठ्ठीद्वारे कर्मचाऱ्यांना कामावर घ्यायचे आणि चिठृठीवर नोकरी संपल्याचे सांगायचे अशी सत्ताधाऱ्यांची पद्धत असल्याचा हल्लाबोल केला होता. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी सभासदांच्या यासंबंधीच्या भावना चिठ्ठीतून उमटल्या.
कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांना उद्देशून, ‘सायबा , तुमचा संपूर्ण कारखाना टेंपररी कामगारच सांभाळतात. तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसता. परमंटना २८ टक्केचा तीस टक्के बोनस केला. परंतु टेंपररी सिव्हिलच्या पोरंना दिवाळीला एक साबण जरी दिला असता तरी त्यांनी तुमचे आभार मानले असते. ’अशा शब्दांत रोष व्यक्त केला आहे.
आणखी एका चिठृठीत, ’के. पी. सायाबा तुम्ही हजारो रोजंदारीच्या जीवाशी खेळलात. त्यांचे करिअर उद्ध्वस्त केलात. तुम्हाला माफ करणार नाही”असेही म्ह्टले आहे. आणखी एका सभासदाने, कारखान्याचे ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन पूर्ण कोलमडले आहे.’असे नमूद केले आहे.