+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Apr 24 person by visibility 214 categoryजिल्हा परिषद
 वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. कोल्हापूर लोकसभेसाठी २३ उमेदवार तर हातकणंगले मतदारसंघासाठी २७ उमेदवार आहेत. सात मे २०२४ रोजी मतदान आहे. तर सोमवारी (२२ एप्रिल) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटची मुदत होती.
 कोल्हापूरसाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक विरुद्ध् महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील व अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत.
 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे -  शाहू छत्रपती (पक्ष –इंडियन नॅशनल काँग्रेस, चिन्ह- हात), संजय भिकाजी मागाडे (पक्ष – बहुजन समाज पार्टी, चिन्ह- हत्ती), संजय सदाशिवराव मंडलिक (पक्ष – शिवसेना, चिन्ह- धनुष्यबाण), संदिप भैरवनाथ कोगले (पक्ष –देश जनहित पार्टी, चिन्ह- बॅट), बसगोंडा तायगोंडा पाटील (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी, चिन्ह- भेटवस्तू), अरविंद भिवा माने (पक्ष – भारतीय राष्ट्रीय दल, चिन्ह- कॅरमबोर्ड), शशीभूषण जीवनराव देसाई (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा. चिन्ह- रोड रोलर), सुनील नामदेव पाटील, (पक्ष – नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, चिन्ह- गॅस सिलेंडर), संतोष गणपती बिसुरे, (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी) (चिन्ह- सीसीटीव्ही कॅमेरा), इरफान आबुतालिब चांद, (पक्ष –अपक्ष, चिन्ह-हिरवी मिरची), कुदरतुल्ला आदम लतिफ, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- शिवणयंत्र), कृष्णा हणमंत देसाई (पक्ष –अपक्ष, चिन्ह- नारळाची बाग), कृष्णाबाई दिपक चौगले (पक्ष –अपक्ष, चिन्ह- हिरा), बाजीराव नानासो खाडे, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- ऊस शेतकरी), नागनाथ पुंडलिक बेनके (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- शिट्टी), माधुरी राजू जाधव (पक्ष –अपक्ष, चिन्ह- प्रेशर ), मुश्ताक अजीज मुल्ला (पक्ष –अपक्ष, चिन्ह- दूरदर्शन), मंगेश जयसिंग पाटील (पक्ष –अपक्ष, चिन्ह-ईस्त्री), ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- कोट), राजेंद्र बाळासो कोळी, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- किटली), सलीम नुरमंहमद बागवान (पक्ष –अपक्ष, चिन्ह-अंगठी), सुभाष वैजू देसाई, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- लिफाफा), संदिप गुंडोपंत संकपाळ, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- बॅटरी टॉर्च). दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विरेंद्र संजय मंडलिक, रुपा वायदंडे, राहुल गोविंद लाड, मालोजीराजे शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
……………………………………..........................
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे -रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष - बहुजन समाज पार्टी, चिन्ह- हत्ती), धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना, चिन्ह- धन्युष्यबाण), सत्यजित बाबासाहेब पाटील सरुडकर (पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, चिन्ह- मशाल), इम्रान इकबाल खतीब (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी, चिन्ह- खाट), डॉ. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी, चिन्ह- टीलर), दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पक्ष –ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह- सिंह), धनाजी जगन्नाथ गुरव (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी, चिन्ह- ऑटो रिक्षा), डी. सी. पाटील (पक्ष- वंचित बहुजन आघाडी, चिन्ह-प्रेशर कुकर ), रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी, चिन्ह- भेटवस्तू), राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष - स्वाभिमानी पक्ष, चिन्ह- शिट्टी), शरद बाबुराव पाटील (पक्ष – एकच मिनिट नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, चिन्ह- गॅस सिलेंडर), संतोष केरबा खोत (पक्ष - कामगार किसान पार्टी, चिन्ह- नारळाची बाग), अस्लम ऐनोद्दिन मुल्ला (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- चिमणी), आनंदराव तुकाराम थोरात (पक्ष- अपक्ष, चिन्ह- किटली), आनंदराव वसंतराव सरनाईक, (फौजू बापू) (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- बॅटरी टॉर्च), जावेद सिंकदर मुजावर, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- फुगा), लक्ष्मण श्रीपती डवरी (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- अंगठी), लक्ष्मण शिवाजी तांदळे, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- हिरा), प्रा. परशुराम तम्मान्ना माने (पक्ष –अपक्ष, चिन्ह- सफरचंद), मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष, चिन्ह- स्पॅनर), महंमद मुबारक दरवेशी (पक्ष – अपक्ष, चिन्ह- एअर कंडिशनर), अरविंद भिवा माने (पक्ष –अपक्ष, चिन्ह- कॅरम बोर्ड), देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष), (चिन्ह- ट्रक), राजेंद्र भिमराव माने, (पक्ष –अपक्ष, चिन्ह- दूरदर्शन), रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष, चिन्ह- कपाट), शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष – अपक्ष, चिन्ह- बॅट), सत्यजित पाटील (पक्ष – अपक्ष, चिन्ह- माईक).
दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीत घेतलेल्यांमध्ये वेंदातिका धैर्यशिल माने, बाबासो यशवंतराव पाटील, शिवाजी विठ्ठल माने, सुनिल विलास अपराध यांचा समावेश आहे.