Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांना

जाहिरात

 

शाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!

schedule12 Jun 26 person by visibility 8 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :नव्या शैक्षणिक वर्षातंर्गत येत्या पंधरा जून २०२६ रोजी शाळांना प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रवेशोत्सव कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांना मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी भेटी देणार आहेत.त्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण, पोषण आहार वाटप होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन केले आहे. लोकप्रतिनधी व अधिकाऱ्यांनी शाळा भेटी देऊन शालेय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता व इतर सोयी सुविधांचा आढावा घेणार आहेत.ग्रामीण भागातील मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल वाढावा याबाबत शिक्षण विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी दिली.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळाभेटीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर मडिलगे खुर्द येथे, मंत्री हसन मुश्रीफ हे कागल तालुक्यातील केंद्र शाळा पिंपळगाव खुर्द येथे भेट देणार आहेत.खासदार शाहू महाराज हे करवीर तालुक्यातील कन्या विद्या मंदिर केर्ली, खासदार धनंजय महाडिक हे विद्या मंदिर सरनोबवाडी, खासदार धैर्यशील माने हे हातकणंगले तालुक्यातील विद्यामंदिर केंद्र शाळा हेरले येथे विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर हे प्रिन्स शिवाजी विद्यालय कसबा बावडा येथे, आमदार सतेज पाटील हे केंद्र शाळा कणेरी, आमदार अमल महाडिक हे विद्या मंदिर सांगवडे, आमदार चंद्रदीप नरके हे पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर मरळी, आमदार विनय कोरे हे पन्हाळा तालुक्यातील केंद्र शाळा वाघवे, आमदार राजेंद्र पाटील हे पीएमश्री कुमार विद्यामंदिर कुरुंदवाड नंबर तीन येथे, आमदार अशोकराव माने हे हातकणंगले तालुक्यातील केंद्र शाळा सावर्डे, आमदार शिवाजीराव पाटील हे चंदगड तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा नागणवाडी, आमदार राहूल आवाडे हे पीएमश्री संजीवन विद्यामंदिर चंदूर/पीएमश्री विद्यामंदिर खोतवाडी, शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे करवीर तालुक्यातील विद्या मंदिर कुडित्रे येथे शाळा भेटीचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत या कागल तालुक्यातील विद्या मंदिर बाळेघोळ, उपाध्यक्ष तानाजी पाटील हे विद्या मंदिर न्यू  वाडदे, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर या केंद्र शाळा कडगाव येथे, शिक्षण समिती सभापती शितल यादव या विद्या मंदिर खोची, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड या विद्या मंदिर कुमार तेरवाड येथे तर महिला व बालकल्याण समिती सभापती या विद्या मंदिर बसर्गे येथे भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय  राठोड हे विद्या मंदिर वरणगे येथे तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन या शाहूवाडी तालुक्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिर साळशी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes