Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवडड धढलिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यातशिक्षण समितीकडून शाबासकीची थाप, कुरुंदवाडच्या पीएमश्री कुमार विद्यामंदिरला दोन कोटी पाच लाखाचा निधीआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालटजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफा

जाहिरात

 

अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!

schedule12 Jun 26 person by visibility 348 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 19व 20 जून 2026 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास कामांची पाहणी करणार आहेत. अंबाबाई  मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारमार्फत मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांच्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळावा व त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

 या दौऱ्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या नेते मंडळींची व पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक झाली. मार्गदर्शन करताना मंत्री पाटील यांनी म्हणाले ,' 19  जून रोजी सायंकाळी अमित शहा यांचे कोल्हापूर येथे आगमन होईल. शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असेल. २० जून रोजी सकाळी अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसर विकासकामांची पाहणी करणार आहेत. यानंतर पोलीस ग्राउंड येथे आयोजित कृतज्ञता मेळावा व जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर इचलकरंजी येथे कलाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान पोलीस ग्राउंड येथे  कोल्हापूरकरांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित  मेळाव्यास नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राहुल आवाडे यांनी सहकार, बँकिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत  शहा यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याची सूचना केली. खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.

बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार चंद्रदीप नरके, अशोक माने, प्रकाश आवाडे,  समरजितराजे घाटगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, संजय पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, प्रदेश  चिटणीस महेश जाधव, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक  प्रा.जयंत पाटील,  मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, आदिल फरास, कौसर बागवान,  राहुल चिकोडे, भूषण पाटील, सावकर मादनाईक, विशाल शिराळे,  स्वाती पाटील, अनिल डाळ्या यांच्यासह  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes