Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांनाकाँग्रेस कार्यालय सजले, शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचा कार्यालय प्रवेश दिमाखातसुट्टीच्या कालावधीत महालक्ष्मी अन्नछत्रचा दोन लाख भाविकांना लाभजिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!

जाहिरात

 

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळे

schedule12 Jun 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  :खाजगी शाळांतील रिक्त शिक्षक पदे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल व शिक्षण आयुक्त एस . पी . सिंग यांच्याकडे केली आहे . 
 राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही "पवित्र पोर्टल प्रणाली "मार्फत करण्यात येते. त्यानुसार 2025 -26 ची संचमान्यता विचारात घेऊन मंजूर पदे,  कार्यरत पदे व रिक्त पदे या बाबी निश्चित करण्यात येतात त्यानंतर  बिंदू नामावली प्रमाणे रोस्टर तपासणी करून रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टल प्रणालीवर अपलोड केल्या जातात . ही प्रक्रिया पूर्ण करण्यसाठी सध्या 15 जून 2026  पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ती वाढविली पाहिजे कारण अजूनही राज्यातील अनेक खाजगी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025-26 ची संच मान्यता अपूर्ण आहे त्यामुळे शाळांच्या रोस्टर तपासणीचे काम झाले झालेले नाही .यामुळे अनेक शाळांना पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये रिक्त पदाची जाहिरात अपलोड करणे अडचणीचे होत आहे .
त्यामुळे  पद भरतीची जाहिरांत अपलोड करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी .व दरम्यानच्या काळात शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना संच मान्यता व रोस्टर तपासणीचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी आदेश करावेत अशी मागणी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes