+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Apr 23 person by visibility 338 categoryगुन्हे
 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शहरातील कुख्यात रवी शिंदे दादा प्रेमी आरसी गॅंग टोळीच्या दहा सदस्यांना जिल्ह्यातून सहा महिने हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २० एप्रिल रोजी टोळीला हद्दपार आदेश बजावला आहे.
 टोळी प्रमुख रवी सुरेश शिंदे, प्रकाश कुबेर कांबळे, संदीप मोतीराम गायकवाड, योगेश मानसिंग पाटील, जावेद इब्राहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रदीप रामचंद्र कदम, अक्षय उर्फ आकाश अशोक कदम, अजय उर्फ अजित सुनील माने, विकी अनिल माटुंगे अशी हद्दपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.
 कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरातील गुन्हेगारींचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आरसी गॅंगच्या विरोधात हद्दपारी कारवाई प्रस्ताव राजाराम पुरी पोलीस ठाण्याची निरीक्षकांना आदेश दिला होता. राजारामपुरी पोलीस निरीक्षकांनी हद्दपारचा प्रस्ताव या गडहिंग्लजचे डीवायएसपी राजेश नवले यांना सादर केला.. चौकशी अधिकारी यांनी केला. आरसी गेम चे विरोधात हद्दपारच्या प्रस्तावाच्या कागदपत्रांची शहानिशा करून त्यांनी तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे दिला. या टोळीच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न,गंभीर दुखावत, दहशत माजवणे. प्राणघातक दरोड्याचा प्रयत्न असे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. अहवालातील निष्कर्ष लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २० एप्रिल पासून पुढील सहा महिन्याकरता आरसी गॅंगला जिल्ह्यातून सहा महिने हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.