+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 24 person by visibility 101 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
जळगाव येथे सुरू असलेल्या आंतरजिल्हा सब ज्युनिअर गर्ल्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर संघावर १-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी कोल्हापूर विरुद्ध मुंबई अशी अंतिम लढत होणार आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) स्पर्धेचे आयोजन केले आहे.
  पूर्वार्धात १८ व्या मिनिटाला नागपूरच्या खेळाडूंने डी मध्ये चेंडू हाताळल्याने पंचानी कोल्हापूर संघांला पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्ण संधीचा फायदा घेत युगंधरा पाटीलने पेनल्टी मारत गोल केला. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत कोल्हापूरने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरकडून समिक्षा चौगुले, प्रिती पाटील, सई बोंडगे, देवयानी पाटील, स्वरा मगदूम यांचा चांगला खेळ झाला.
संघाला प्रशिक्षक अमित शिंत्रे व सहाय्यक प्रशिक्षक सानिका पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.