Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांनाकाँग्रेस कार्यालय सजले, शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचा कार्यालय प्रवेश दिमाखातसुट्टीच्या कालावधीत महालक्ष्मी अन्नछत्रचा दोन लाख भाविकांना लाभजिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!सतेज पाटलांनी आणलेल्या टोलचे भूत महायुती सरकारने गाडले, ते काय आमची हत्तीवरुन मिरवणूक काढणार ? आमदार राजेश क्षीरसागर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणीसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीशिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभा

जाहिरात

 

काँग्रेस कार्यालय सजले, शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचा कार्यालय प्रवेश दिमाखात

schedule12 Jun 26 person by visibility 18 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हारा-फुलांची सजावट, कार्यकर्त्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह, आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती अन् शुभेच्छांचा वर्षाव अशा वातावरणात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचा कार्यालय प्रवेश व पदग्रहण कार्यक्रम झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन शहराध्यक्ष केसरकर यांचा सत्कार करण्यात आला.

काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, शशांक बावचकर,बाळासाहेब सरनाईक, सरला पाटील, भारती पोवार, माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी, ‘नागरी प्रश्नांवर शहर काँग्रेसने सातत्याने आवाज उठवावा. संघटनात्मक बांधणीसाठी शहरात सहा ब्लॉक कमिट्या स्थापण्यात येणार आहेत. प्रत्येक ब्लॉक कमिटीची स्वतंत्र कार्यकारिणी असेल. लोकांशी निगडीत विषय हाती घेऊन ब्लॉक कमिटीनेही पंधरा दिवस, महिन्यातून एकदा आंदोलने करावीत.’ याप्रसंगी सर्वच मंडळींनी नूतन शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचे कौतुक केले. केसरकर यांनी, भाषणात ‘सगळयांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाचे काम करणार आहे.असे सांगितले. माजी अध्यक्ष चव्हाण यांनी मनोगतामध्ये नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगरसेवक अमर समर्थ, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, प्रशांत खेडकर, दिपाली घाटगे, स्वाती यवलुजे, डॉ. सुषमा जरग, ऋग्वेदा माने, राहूल माने, विनायक कारंडे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, भूपाल शेटे, विनायक सुर्यवंशी, वैशाली महाडिक, रुपाली पवार- धामोडकर, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. संपतराव चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes