महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स अकॅडमी संघाने रमेश कदम अकॅडमी चा १८६ धावांनी दणदणीत पराभव करत माजी आमदार दिनकरराव यादव स्मृती स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात सुदर्शन कुंभार (75 धावा), यतीराज पाटोऊ (64 धावा) व सुरज कोंढाळकर (60 धावा) यांची अर्धशतके,
भरत पुरोहीतचे 15 बळी याचा जोरावर मोगणे संघाने विजेतेपद पटकावले.कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा यादव परिवाराने पुरस्कृत केली होती.
राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलदांजी करताना पहिल्या डावात आण्णा मोगणे संघाने 45.1 षटकांत सर्वबाद 254 धावा केल्या. यामध्ये सुदर्शन कुंभारने 75, रोहीत गिरी 37, अल्केश कवाळे 27, सुरज कोंढाळकर 26, अभिनंदन गायकवाड 23, सुरज जाधव 14 धावा करत संघाची मोठी धावसंख्या उभारली. रमेश कदम अकॅडमीकडून यतीराज पाटोळेने 4, चेतन नार्वेकर व वसीम मुल्लाणी यांनी प्रत्येकी 2, मिहीर किल्लेदार व पार्थ गणबावले यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या रमेश कदम किक्रेट अकॅडमी चा पहिल्या डाव 29.1 षटकांत 95 धावात संपुष्टात आला. यामध्ये करण वाघमोडेने 26, वसीम मुल्लाणी 17, चेतन नार्वेकर व धैर्यशील पाटील प्रत्येकी 13 धावा केल्या. आण्णा मोगणे कडून भरत पुरोहीतने 7, सुरज जाधवने 2 व संदीप पाटीलने 1 बळी घेतला. दुसऱ्या डावातआण्णा मोगणे संघाने 39.4 षटकांत सर्वबाद 218 धावा केल्या.यामध्ये सुरज कोंढाळकर 60, महेश मस्के 49, रोहीत गिरी 31, सुरज जाधव 28 धावा केल्या. दुसया डावात रमेश कदम कडून मिहीर किल्लेदारने 4, रोहन सावंतने 3, वसीम मुल्लाणीने 2 व यतीराज पाटोळेने 1 बळी घेतला. रमेश कदम किक्रेट अकॅडमी चा दुसरा डाव 42 षटकांत सर्वबाद 191 धावात संपुष्टात आला.यामध्ये यतीराज पाटोळेने 64, चेतन नार्वेकर 53, धैर्यशील पाटील 27 व मिहीर किल्लेदार 15 धावा केल्या. आण्णा मोगणेकडून भरत पुरोहीतने 8 व सुदर्शन कुंभारने 2 बळीघेतले. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस अकॅडमी ने 186 धावानी विजय मिळवला .
विजयी संघ : भरत पुरोहीत(कर्णधार), अभिनंदन गायकवाड, अखिलेश अब्दागीरे, अल्केश् कवाळे, महेश मस्के, रोहीत गीरी, संदीप पाटील, सत्वशील हळदकर, सुदर्शन कुंभार, सुरज जाधव, सुरज कोंढाळकर, आतिष वरपे, गिरीष पोळ, निल कदम, श्रेयस चव्हाण, स्मित पाटील, श्रीराज चव्हाण, संघ व्यवस्थापक शशिकांत (बापू) मोगणे .