Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशाराशिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडेकोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळीमुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापट

जाहिरात

 

महायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशारा

schedule09 Nov 26 person by visibility 11 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गोकुळ वाचवा लोकशाही टिकवा, कोल्हापूरची संस्था गुजरातच्या दारी बांधू नका, कोल्हापूरची अस्मिता गोकुळ वाचवा ' अशा घोषणा देत  कोल्हापुरात जनसागर रस्त्यावर उतरला. पुणे निषेधाचे फलक हाती  घेतले होते तर कोणी काळे कपडे परिधान केले होते. गोकुळमधील अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी महायुती दूध उत्पादकाने दिलेला कौल डावलत आहे व लोकशाहीचा गळा घोटत आहे असा आरोप करत सरकारच्या निर्णयाच्या विरोधात संघर्ष मोर्चाचे आयोजन केले होते. शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन सरकार लोकशाही संपवत आहे असा हल्लाबोल यावेळी करण्यात आला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंतचा मार्ग सरकारच्या विरोधातील घोषणांनी दुमदुमला. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली. 'समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत आहे, महायुतीने गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील  यांना अध्यक्ष करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या सभेला महायुतीच्या संचालकांना उपस्थित ठेवावे' असे आवाहन केले.
  गोकुळच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीला 13 जागा तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. अध्यक्ष निवडीच्या सभेला 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे मात्र कोरम पूर्ण होत असल्यामुळे अध्यक्ष निवड लांबणार पडत आहे समविचारी आघाडी आणि महायुती मध्ये गोखरू मधील सत्ता संघर्ष चिघळला आहे. ही लढाई आता कोर्टापर्यंत पोहोचले आहे तसेच सहमचारी आघाडीने गोकुळ मध्ये लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावरची लढाई करू अशी घोषणा देत सोमवारी त्याचे प्रत्यंतर दिले. या मोर्चाद्वारे महायुतीला थेट इशारा  देण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. दसरा चौक येथून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  मोर्चाला सुरुवात झाली. तत्पुरे दसरा चौक परिसर जनसागराने भरून गेला होता सकाळी दहा वाजल्यापासूनच दूध उत्पादक शेतकरी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने दसरा चौकात दाखल होत होते. महायुती सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेऊन मोर्चात सामील होत होते दसरा चौक परिसर शहाजी कॉलेज समोर रस्ता विनर्स कॉर्नर परिसर कलेक्टर ऑफिस रोडवर सगळीकडे मोर्चासाठी आलेल्या नागरिकांचीच गर्दी दिसत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आमदार सतीश पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बैलगाडीतून दसरा चौक परिसरात दाखल झाले त्यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा मार्गस्थ झाला मोर्चातील फरक लक्षवेधी होते. कोल्हापुरी पायताणची प्रतिकृती मोर्चात लक्ष वेधून घेत होती. दूध उत्पादक मोर्चामध्ये म्हैस, रेडा, घोडा घेऊन दाखल झाले होते. मलाही शासन नियुक्त संचालक व्हायचे आहे असा उपरोधित फलक या जनावरांच्या अंगावर घातला होता.
या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच सांगली, सातारा, सोलापूर, पुणे,लातूर येथील शेतकरी आणि कार्यकर्तेही सहभागी होत मोर्चाची ताकद वाढवली. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील या मोर्चात सहभागी होत सरकारच्या विरोधातील लढाईत सहभाग नोंदवला. 'बंटी पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...' अशा घोषणा दिल्या जात होत्या.
 काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष, डाव्या चळवळ,  शेतकरी कामगार पक्ष,  जनता दल यांच्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशन पाणीपुरवठा संस्था या मोर्चात सहभागी झाल्या. महाविकास आघाडीचे नेते मंडळी बैलगाडीतून मोर्चात सहभागी झाले. खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील हे बैलगाडीतून मोर्चात सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
 जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी खासदार शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार जयंत आसगावकर, संजय पवार, विवेकानंद पाटील यांनी गोकुळ मध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरून माहिती सरकारवर निशाणा साधला दूध उत्पादकांनी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे मग हा कौल डावलण्याचा महायुती सरकारला अधिकारच काय ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes