Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला नॅशनल को-जन पुरस्कार प्रदानआरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ, सहा संघ सहभागीविद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर राष्ट्रीय मोहोर , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत संशोधन प्रकल्पराजर्षी शाहूंचे परिवर्तनवादी विचार नेपाळमधील समाजिक संस्थेत रुजवा- युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतीजिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफजिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफस्थानिक स्वराज्यच्या निवडणुका महायुतीद्वारे ! सहकारी संस्थेत सारे एकत्र !! हसन मुश्रीफधर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात - पालकमंत्री प्रकाश आबिटकर संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटप

जाहिरात

 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफ

schedule18 Apr 25 person by visibility 18 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्न उभे ठाकत आहेत. साखर कारखानदारी संकटात आहे. गेल्या दहा वर्षात एफआरपीमध्ये झालेली वाढ, साखर दरवाढीचा अभाव असे विदारक चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास ३६ कारखाने आहेत. कारखानदारीची सध्य स्थिती समोर येण्यासाठी येत्या महिनाभरात सगळया कारखान्यांची श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे असे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी मार्केट यार्ड येथील कार्यालयात झाला. याप्रसंगी बोलताना त्यांनी साखर कारखानदारी, सहकारी संस्थेतील निवडणुका, कृषी क्षेत्रात एआयचा वापर अशा विविध गोष्टीवर ऊहापोह केला. ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर अवलंब करावा लागणार आहे. साखर कारखानदारीसाठी एआय हा आशेचा किरण आहे. बारामतीमध्ये ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. एआयचा अवलंब केल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होणार आहे. भविष्यात पेट्रोलचा वापर कमी होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू आहे. यामुळे इथेनॉल मिश्रणावरही मर्यादा येणार आहेत. सौरऊर्जा प्रकल्पावर भर आहे. यामुळे साखर कारखान्याचे वीज कोण घेणार ?  या साऱ्या बाबींचा विचार करुन एआयसारख्या नव तंत्रज्ञानाचा स्वीकार साऱ्यांनी केला पाहिजे. ऊस उत्पादनात वाढ करावी लागणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

…………….

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार, पण योग्यवेळी

मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेंतर्गत दरमहा २१०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण ही रक्कम योग्य वेळी जमा केली जाईल. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका आहेत. २१०० रुपये जमा केले नाहीत तर मते कशी मिळतील ? याची जाणीव सरकारला आहे. योग्य वेळी २१०० रुपये देऊ. विरोधकांनी योजनेवरुन कितीही अफवा पसरविल्या तरी ही योजना बंद होणार नाही. विकासकामांसाठी निधीची तरतूद केली आहे. विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही.’

पोरीनं ऑलिपिंकमध्ये इतिहास घडविला ! कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक !!

schedule07 Aug 24 person by visibility 85 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन : चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेविरोधात शड्डू ठोकणारी, खेळाडूंवर होत असलेल्या अन्यायविरोधात आवाज उठविणारी संघर्षशील कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिक पदक जिंकत संबंध जगभर भारताचा डंका वाजवला. कुस्ती क्रीडा प्रकारात ऑलिपिंक पदक जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीगीर बनली. पॅरिस ऑलिपिंकमध्ये अंतिम फेरीत तिने अमेरिकच्या सारा अॅन हिल्डब्रँड हिचा पराभव करत भारताला यंदा पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या दमदार कामगिरीमुळे सुवर्णपदकाच्या तालिकेत भारताला स्थान मिळाले. विनेश फोगटच्या या कामगिरीने संबंध देशभर तिची वाहवा होत आहे.
५० किलो वजन गटात विनेशने देदिप्यमान यश मिळवले. यापूर्वी मंगळवारी झालेल्या उंपात्य फेरीच्या लढतीत क्युबाच्या युसनेलिस गुजमानला ५-0 अशा फरकांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. तिने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताच्या खात्यात एक पदक निश्चित केले होते. अंतिम फेरीत तिने सुवर्णपदक जिंकावे अशी सारी भारतवासियांची ईच्छा होती. अंतिम लढतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा अॅन हिल्डब्रँड सोबत तिची लढत झाली. ५० किलो फ्री स्टाइल गटातील या तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांच्या नजरा होता.
विनेश ही मूळची हरियाणा येथील. २५ ऑगस्ट १९९२ रोजीचा तिचा जन्म. फोगट कुटुंबीयांत कुस्तीचा वारसा लाभलेला. कुस्ती प्रशिक्षक महावीरसिंग फोगट यांची ही पुतणी. महावीर फोगट यांच्या मुलीही आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत. कुस्तीचा वारसा लाभलेल्या विनेशने आतापर्यंत विविध स्पर्धा गाजविल्या आहेत.महिला कुस्तीपटूमधील आश्वासक चेहरा म्हणून विनेश फोगटकडे पाहिले जाते.. २०१८ मध्ये इंडोनिशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारयीय महिला ठरली होती. २०२० मध्ये तिला भारत सरकारने खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानि करण्यात आले होते.

कोकण-कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात ८ वाघांच्या हालचाली कॅमे-यात कैद

schedule27 Sep 22 person by visibility 365 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकण आणि कोकणमार्गे कोल्हापूरात संचार करणा-या वाघांच्या अस्तित्वावर अखेर वनविभागाने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहोर उमटवली आहे. दक्षिण कोकण आणि कोल्हापूरात वनविभाग आणि शास्त्रज्ञांना ८ वाघांचे दर्शन घडले आहे. त्यापैकी वाघाची एक जोडी आता दक्षिण कोकणातील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले.
वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. दोन वर्षांपूर्वी कोकण आणि कोल्हापूरात जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात हे ८ वाघ वावरताना शास्त्रज्ञांना दिसले.
२०१४ पासून वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही संस्था कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून कोकणातून येणा-जाणा-या वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. आठ वर्षांपासून वाघाची एक जोडी कोकणात कायमस्वरुपी राहत असल्याचे वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी दिली. इतर सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत असले तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणणे घाईचे ठरेल. दरवर्षाला कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यांत किती वाघ स्थायिक झालेत याबाबतची खात्रीलायक माहिती मिळेल, असेही ते म्हणाले.
कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघ काही काळासाठी कोकण पट्ट्यांत येत आहेत. वाघीणींची संख्या कमी असल्याने वाघ या भागांत फार काळ थांबत नसल्याचेही पंजाबी म्हणाले.

कॅमेरा ट्रॅप सर्व्हेक्षणाबाबत 
नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरातील तब्बल २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले गेले.
मार्च महिन्यात कोल्हापूरातील राधानगरीत आढळून आलेला वाघ आता अभयारण्याबाहेर ये-जा करु लागला आहे. या वाघाला स्थानिक म्हणता येणार नाही, अभयारण्यात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. कोकण आणि कोल्हापूरात वाघांचा वावर असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे. - विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, कोल्हापूर वनविभाग

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes