महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
schedule15 Aug 26 person by visibility 12 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर अंतर्गत, ललितकला भवन राजारामपुरी कोल्हापूर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महात्मा गांधीनी अहिंसेच्या आंदोलनातून मिळविलेल्या स्वातंत्र्याची माहिती देत, आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करायला हवा असे सांगितले. अंनिसचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा देत आपल्या वर्तनातून देश बालशाली करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले. यावेळी गुणवंत कामगार संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, संजय चव्हाण, सुभाष पाटील, दिनकर आडसूळ, बाळासाहेब कांबळे, रामदास देसाई, नाट्य कलावंत संजय पाटील, मोहन घाडगे, अमोल डांगे उपस्थित होते. केंद्र संचालक संघसेन जगतकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय खराडे यांनी आभार मानले.