Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अश्रूनी डबडबलेले डोळे…अनावर हुंदका…गहिवरलेली मने अन् हृदय पिळवटणून टाकणारा आईचा टाहो…असाही एक . . . आगळावेगळा शाही विवाह सोहळाप्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे  निधनशिवाजी विद्यापीठाकडे पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्ती करावी; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटील

जाहिरात

 

पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल

schedule24 Jun 24 person by visibility 944 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना याबाबत नेहमी पत्रकार परिषदा घेणारे समरजित घाटगे आता गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलच्या आधारे २ ते ५ जूनच्या दरम्यान त्यांची २० लाख
रूपयांची फसवणूक झाली आहे. ही मागणी झाल्यानंतर त्याक्षणी त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती. कोल्हापूर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे पती समरजित घाटगे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरचे संबंध असतानाही अजूनही गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळल्या नाहीत ? ज्या बँक खात्यावर हे पैसे वर्ग झाले त्या बँक खात्यांचा शोध अद्याप का लागला नाही? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.            
यावेळी माधवी मोरबाळे, रेखा आवळे, पदमजा भालबर, जहिदा मुजावर, शहनाज अत्तार, पूजा साळोखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. याबाबत या सर्वांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनाही निवेदन दिले. या संपूर्ण प्रकाराची तपासणी व कारवाई व्हावी अशी मागणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes