Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अश्रूनी डबडबलेले डोळे…अनावर हुंदका…गहिवरलेली मने अन् हृदय पिळवटणून टाकणारा आईचा टाहो…असाही एक . . . आगळावेगळा शाही विवाह सोहळाप्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे  निधनशिवाजी विद्यापीठाकडे पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्ती करावी; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटील

जाहिरात

 

अश्रूनी डबडबलेले डोळे…अनावर हुंदका…गहिवरलेली मने अन् हृदय पिळवटणून टाकणारा आईचा टाहो…

schedule01 May 26 person by visibility 475 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राचार्य, संस्थेच्या सचिव म्हणून त्या पदावर असल्या तरी संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांशी त्यांचा स्नेह जुळलेला...या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला नेहमी तत्पर. विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रमाना चालना देणाऱ्या...‘ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार’ हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी सतत क्रियाशील असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे त्यांची ही विविध रुपं आठवत आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना शुक्रवारी साऱ्यांचे डोळे डबडबलेले होते. आपल्याच घरातील एखादी कर्ती व्यक्ती हरपल्याची भावना साऱ्यांच्या मनीत्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना..त्यांच्या अंत्ययात्रेसोबत चालताना विवेकानंदच्या ‘गुरुदेव कार्यकर्त्यांचा’ हुंदका दाटून येत होता.हात आपोआप नमस्कारसाठी जोडले जात होते कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्यातील विविध भागातून आलेल्या असंख्य जणांच्या उपस्थितीमध्ये पंचंगंगा स्मशानभूमी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला अग्नी देताच क्षणभर सारं वातावरण निस्तबध् बनलंसमाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित श्रद्धाजंली वाहिली.

वयाच्या ५३ व्या वर्षी प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांचे गुरुवारी, तीस एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. शुक्रवारी, एक मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासून विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाखांचा विस्तार विविध जिल्ह्यात. शिक्षणमहर्ष बापूजी साळुंखे यांच्या नात व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या त्या कन्या. मात्र संस्थेत त्यांनी स्वतची ओळख निर्माण केली होती. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या म्हणून त्यांनी या ज्ञानशाखेला नावारुपाले आणले.  विवेकानंद कॉलेज सोबतच दहावी व बारावीच्या बोर्डात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेलंसंस्थेच्या प्राचार्य म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे व प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा शैक्षणिक वारसा त्या तितक्याच खंबीरपणे पुढे चालविलासंस्थेसाठीचे त्यांचे योगदान साऱ्यांना माहितप्राचार्या, सचिव म्हणून संस्थेतील प्रत्येक घटकांशी त्यांचा संपर्क आलेला. प्राध्यापक व प्राचार्य म्हणून विद्यार्थी वर्गात त्या प्रिय होत्यात्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडताना प्राध्यापक, कर्मचारी गहिवरले

शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई, सेवानिवृत्त प्राचार्या शैलजा साळुंखे या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आल्या. काचपेटीत ठेवलेल्या मुलीचे पार्थिव पाहताच त्यांना फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. स्मृतिभवनमध्ये उपस्थित प्राचार्य अभयकुमार साळुंखे, निवृत्त एलआयसी अधिकारी मुरलीधर गावडे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख प्रा. श्रीराम साळुंखे, प्रा. श्रृती जोशी यांच्यासह सारे साळुंखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले. या कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकांना सावरत होता... स्मृतिभवन येथे सकाळी ११ वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे काही वेळ वाहन थांबविले. त्यानंतर संस्थेच्या प्रागंणातून ही अंत्ययात्रा विवेकानंद कॉलेजसमोरुन जिल्हा परिषद चौक, नागोबा मंदिर रोड ते गावडे यांच्या निवासस्थानापर्यत पोहोचली.

येथून अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून त्यांना अभिवादन करत होते. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दूरदूरहून प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते. सारा परिसर शोकाकूल बनलेला.  त्यांच्या पार्थिवास अग्नी देताच पुन्हा एकदा साऱ्यांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. याठिकाणी झालेल्या शोकसभेत अनेकांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत अभिवादन केलेमात्र प्रत्येकाच्या डोळयासमोर गावडे मॅडमची छबी आणि मनात असंख्य आठवणी...

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes