Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहा टक्के पगारवाढशिवसेना ठाकरे पक्षातर्फे सोमवारी महापालिकेला घेराओकाँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत कोल्हापूरचे तिघे जनरल सेक्रेटरीपदीशिक्षक बँकेच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनांची सोमवारी निवड ! शिवाजीराव रोडे-पाटील, गजानन कांबळेंची नावे चर्चेत !!केंद्रप्रमुख भरतीसाठी अधिसूचना, जिल्ह्यात होणार ८५ जणांची थेट भरतीविद्यापीठाने नेमली चौकशी समिती, सदस्य देणार भोगावती महाविद्यालयाला भेटदत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमधून सुसंस्कारी वकील-न्यायाधीश निर्माण होतील –प्राचार्य अभयकुमार साळुंखेआयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटना

जाहिरात

 

कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना निश्चित होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule23 May 25 person by visibility 251 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच  स्थापन करणेसाठी राज्य सरकार तयार आहे, सर्किट बेंचची स्थापना निश्चितपणे कोल्हापूर येथे होणार" अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे केले.
    कोल्हापूर विमानतळावर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांचेसोबत बैठक घेऊन  निर्णय घ्यावा अशी विनंती केली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे निश्चित स्थापन होणार, त्यासाठी  पाठपुरावा सुरु आहे. मुख्य न्यायमूर्तिसोबत चर्चा केली आहे लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
    यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अंमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तसेच बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.तुकाराम पाडेकर, सेक्रेटरी ॲड. मनोज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. संपतराव पवार, ॲड. धनंजय पठाडे, ॲड.शिवाजीराव राणे, ॲड. संकेत सावर्डेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes