यसबा करंडक चौदा डिसेंबरला, आंतरशालेय कला महोत्सव रंगणार
schedule03 Dec 24 person by visibility 59 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे माजी सदस्य यशवंत भालकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर २०२४ रोजी ‘यसबा करंडक आंतरशालेय कला महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवसाठी चार डिसेंबरपर्यंत शाळांनी नोंदणी करावी असे आवाहन संयोजक नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाऊंडेशनतर्फे हा महोत्सव होत आहे. शिवाजी विद्यापीठात हा आंतरशालेय कला महोत्सव रंगणार आहे. महोत्सवात चित्रकला, मातीकाम, एकपात्री अभिनय, निबंधलेखन, समूह गायन, समृह नृत्य असे सहा प्रकार असतील. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत आहे. विद्यार्थी विकास मंडळाचे प्रभारी संचालक टी एम चौगुले, फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव-भालकर, संदीप जाधव, भूषण पाठक, रितेश सुतार, आशिष हेरवाडकर, ऋषीकेश आडनाईक, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.