Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीज कंत्राटी कामगार संघाचे संर्पक अभियानराष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत स्वरा कुसाळे ठरली  दोन सुवर्णपदकांची मानकरीप्राधिकरण सक्षम करा, ४२ गावाच्या विकासासाठी दोन हजार कोटीचा निधी द्या-सरपंचासह पदाधिकाऱ्यांची मागणीकामात हलगर्जींपणा चालणार नाही, कधीही कोणत्याही विभागाची तपासणी करणार- प्रशासक कार्तिकेयन एसराज्यस्तरीय अधिकारी करणार साक्षरता वर्गांची पाहणी, शिक्षण संचालकांसह अधिकारी देणार भेटसाखरेची किमान आधारभूत किंमत ४२०० रुपये करावी, खासदार महाडिकांची राज्यसभेत मागणीजागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मच्छिंद्र नाळे, व्हाइस चेअरमनपदी कृष्णात चौगलेवारणेत रंगणार विभागीय साहित्य संमेलन, चंद्रकुमार नलगेंना जीवनगौरव पुरस्कारगाय दूध दरातील कपात मागे घ्यावी, वडणगेतील दूध उत्पादकांची मागणी

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मच्छिंद्र नाळे, व्हाइस चेअरमनपदी कृष्णात चौगले

schedule03 Dec 24 person by visibility 199 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मच्छिंद्र नाळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी कृष्णा चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार विभागातील अधिकारी निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडीची सभा झाली. 
चेअरमनपदासाठी नाळे यांचे नाव संचालक साताप्पा कासार यांनी सुचवले. त्यास संचालक सर्जेराव नाईक यांनी अनुमोदन दिले. व्हाइस चेअरमन पदासाठी श्रीकृष्ण नाईक यांचे नाव संचालक सूर्यकांत बरगे यांनी सुचविले.  संचालक वसंत पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी मावळते  चेअरमन सूर्यकांत बरगे,व्हाइस चेअरमन सर्जेराव नाईक व मानव सचिव साताप्पा कासार यांचा  सन्मान करण्यात आला . संचालक  महादेव डावरे, शिवाजी सोनाळकर, संतोष आयरे यांची अभिनंदनपर भाषणे झाली. संस्थापक रसाळे यांनी पतसंस्थेच्या कारभाराचा आढावा घेऊन नूतन पदाधिकारी यांनी सूक्ष्मपणे पतसंस्थेचा कारभार करून लौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली

सभेप्रसंगी संचालिका माधुरी घाटगे ,राजेश कोंडेकर, राजेंद्र कोरे, रोहिणी यडगे, अमित परीट, सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार, दशरथ कांबळे, पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर , आप्पासाहेब वागरे तसेच कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल नाळे, कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे,  सांगरूळचे उपसरपंच सुशांत नाळे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख प्रशांत नाळे, कुंभी कामगार सोसायटीचे सरदार सासणे, आदित्य बिल्डर्सचे प्रशांत वातकर, उद्योगपती रोहित रसाळ, गोरख वातकर उपस्थित होते. कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी सूत्रसंचालन केले.

......................................

“ पतसंस्थेचा कारभार हा पारदर्शक व काटकसरीचा करणार आहे. ठेवींमध्ये वाढ, सभासदहिताचे नवीन उपक्रम व सभासदांच्या हिताच्या योजना राबविण्याला प्राधान्य राहील.”

- मच्छिंद्र नाळे, चेअरमन

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes