वीज कंत्राटी कामगार संघाचे संर्पक अभियान
schedule04 Dec 24 person by visibility 245 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय मजदूर संघ ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने एक डिसेंबर ते वीस डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात वीज कंत्राटी कामगारांना भेटून संवाद, चर्चासत्र, मेळाव्याच्या माध्यमातून कामगार कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे.
कंत्राटदार विरहित कामगार हरियाना पटर्न तिन्ही वीज कंपनीत नक्कीच लागू होईल यासाठी तिन्ही वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एका झेंड्याखाली संघर्ष करावा लागेल असा ठाम विश्वास अण्णा देसाई यांनी विश्वकर्मा भवन पुणे येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी च्या बैठकीत व्यक्त केला.
प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या संपर्क अभियान मेळाव्यात सर्व कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघांचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले
या वेळी सुभाष सावजी, शरद संत, सरचिटणीस सचिन मेंगाळे,पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटनमंत्री उमेश आनेराव व उपमहामंत्री राहुल बोडके उपस्थित होते. या बैठकीसाठी २६ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरमधील पदाधिकारी अमर लोहार, विजय कांबळे,अमोल भास्कर, राहुल भालबर,जय माळी, सागर देसाई पदाधिकारी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा पदाधिकारी निखिल टेकवडे,सुमीत कांबळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.