Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार…राष्ट्रवादी ठरला मोठा भाऊ!जिल्ह्यात ताकत हसन मुश्रीफांचीच ! २० जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्षपदासाठी शड्डू ! !गगनबावडयात काँग्रेसचेच वर्चस्व, सोनाली पाटील, संभाजी पाटणकर विजयीकळंबामध्ये विनीता भोगमनी फुलविले विजयाचे कमळडीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!!

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार…राष्ट्रवादी ठरला मोठा भाऊ!

schedule09 Feb 26 person by visibility 209 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ६८ जागेसाठी घेतलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा वीस जागा जिकंत महायुतीत मोठा भाऊ ठरला. महायुतीचे घटक असलेल्या भाजपाला बारा तर शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या. काँग्रेसने चौदा जागा जिंकल्या आहेत. तर गारगोटीतील शिवशाहू आघाडीचे उमेदवार हे काँग्रेस पुरस्कृत आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाने सहा जागेवर विजय मिळवला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने चार जागा तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे पक्षाला एक जागा जिंकता आली.

जयी उमेदवार पुढीलप्रमाणे पक्षनिहाय : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष – कागल तालुक्यातील मतदारसंघ कसबा सांगाव – सुवर्णा कांबळे, बोरवडे – श्रीमती शोभा फराकटे. सेनापती कापशी –शिल्पा खोत. करवीर तालुका सांगरुळ मतदारसंघ – रेखा मुगडे, पाडळी खुर्द – राजेंद्र सुर्यवंशी, सडोली खालसा – क्रांतिसिंह पवार. चंदगड तालुका माणगाव मतदारसंघ – मानसी कल्लाप्पा भोगण, कुदनूर – विद्या विलास पाटील, तुडये – रचना मष्णू  गावडे. पन्हाळा तालुका सातवे –जयंत प्रदीप पाटील, पोर्ले तर्फ ठाणे – भगवान पंडितराव पाटील. यवलूज – पूजा दिलीप पाटील. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे मतदारसंघ – राजकुंवर रणवीरसिंह  गायकवाड. आजरा तालुका उत्तूर – शिरीष देसाई, पेरणोली –सुधीर देसाई. गडहिंग्लज तालुका हलकर्णी मतदारसंघ –शिवशंकर हत्तरकी, भडगाव –अमर चव्हाण, गिजवणे –शैलजा सतीश पाटील, नेसरी –संग्रामसिंह कुपेकर. राधानगरी तालुका कसबा तारळे – अमृता डोंगळे

भारतीय जनता पक्ष :– करवीर तालुका कळंबा – विनिता सागर भोगम, उचगाव – नामदेव वाईंगडे, मुडशिंगी – तानाजी पाटील. हातकणंगले तालुका शिरोली–सलीम अब्बास महात, कोरोची–सानिका आवाडे, कबनूर –कुमार मारुती कांबळे, पट्टणकोडोली –महेश पाटील. शिरोळ तालुका आलास मतदारसंघ – प्रशांत शहापुरे. कागल तालुका सिद्धनेर्ली –सुयशा घाटगे. म्हाकवे –काकासाहेब सावडकर, नानीबाई चिखली –शिवानी भोसले. चंदगड तालुका आडकूर– राजश्री लक्ष्मण गावडे. शिवसेना :– पन्हाळा तालुका कोतोली मतदारसंघ – वर्षाराणी अरुण पाटील. हातकणंगले तालुका आळते – वर्षा सावर्डेकर, रुकडी –आतिष शिंगे, रेंदाळ –शिवाजी मुरलीधर जाधव. शिरोळ तालुका उदगाव मतदारसंघ –अमोल चव्हाण. करवीर तालुका वडणगे –इंद्रजीत पाटील. भुदरगड तालुका पिंपळगाव –रोहिणी आबिटकर, आकुर्डे –अर्चना निकम. कडगाव–सारिका नांदेकर. जनसुराज्य शक्ती पक्ष : हातकणंगले तालुका कुंभोज – शीतल प्रवीण यादव,  शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारणा– सर्जेराव पाटील पेरीडकर, आंबार्डे –स्नेहल वेल्हाळ. कोडोली मतदारसंघ – अमरसिंह पाटील (अपक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष पुरस्कृत). पन्हाळा तालुका कळे – शोभा बेलेकर. गडहिंग्लज तालुका कसबा नूल – अनिरुद्ध रेडेकर. तरआमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी : शिरोळ तालुका नांदणी मतदारसंघ – प्रचिती कोळी, अब्दुललाट – श्रद्धा गायकवाड, उदगाव –अमोल चव्हाण, दत्तवाड – उत्तरा शिंदे.  

काँग्रेसची कडवी झुंज

काँग्रेस : करवीर तालुक्यातील पाचगाव मतदारसंघ – संग्राम पाटील, शिंगणापूर– रसिका पाटील, निगवे खालसा –एकनाथ पाटील, गोकुळ शिरगाव –सुदर्शन खोत, शिये –विश्वनाथ पाटील. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक – सागर पांडूरंग धुंदरे, सरवडे –संयोगिता रणधीर मोरे, राधानगरी – अभिजीत तायशेटे. हातकणंगले तालुक्यातील घुणकी मतदारसंघ – शुभांगी महेश कुंभार, भादोले – सोनाली राहुल सावंत, रुई – राहुल राजू आवळे. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी मतदारसंघ – सोनाली विलास पाटील, असळज –संभाजी शांताराम पाटणकर. शिरोळ तालुका यड्राव मतदारसंघ – अर्चना चौगले, गारगोटी – रेश्मा राहुल देसाई (शिवशाहू आघाडी). स्वाभिमानी शेतकरी संघटना : शिरोळ तालुका दानोळी :नंदिनी संदिप कांबळे. शिवसेना ठाकरे पक्ष  : शाहूवाडी तालुक्यातील सरुड मतदारसंघ– अमरसिंह हंबीरराव पाटील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes