Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चाभाजपाकडे शेकडो इच्छुकांचे अर्ज, मुलाखतीनंतर प्रभागात सर्व्हेक्षण !यसबा करंडकचा मानकरी वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल ! उपविजेतेपद विमला गोयंका स्कूलला ! !नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !

जाहिरात

 

कोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !

schedule15 Dec 25 person by visibility 252 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी 15 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार 15 जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

 राज्यातील अनेक महापालिकांच्या  सभागृहाची मुदत संपल्यामुळे गेली पाच व तीन वर्ष अनेक ठिकाणी नगरसेवक नाहीत. महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सूचना आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग त्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत आहे. राज्य निवडणूक विभागाचे आयुक्त वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील घोषणा केली. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी जानेवारी रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी वीस प्रभाग असून 81 सदस्य संख्या आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 23 ते 30 डिसेंबर 2025  या कालावधीत आहे तर अर्जांची छाननी या 31 डिसेंबर 2025  रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत 2 जानेवारी 2026 आहे. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी 2026 ला आहे  संपूर्ण राज्यभरात  महापालिकेसाठीकाच वेळी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या तारखेला 16 जानेवारी  मतमोजणी होणार आहे. मुंबई, नागपूर  ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, लातूर, नांदेड, अकोला, परभणी, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी, सोलापूर, जालनासह २९ महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना आहे. तर 28 महानगरपालिकेत बहु सदस्यीय प्रभाग रचना आहे. उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. एक जुलै 2025 रोजी प्रभाग निहायनिश्चित केलेली  केलेली मतदार यादी ग्राह्य धरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes