Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चाभाजपाकडे शेकडो इच्छुकांचे अर्ज, मुलाखतीनंतर प्रभागात सर्व्हेक्षण !यसबा करंडकचा मानकरी वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल ! उपविजेतेपद विमला गोयंका स्कूलला ! !नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !

जाहिरात

 

चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान

schedule15 Dec 25 person by visibility 40 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने गेली 20 वर्षे रक्तदानाचा सामाजिक उपक्रम नियमितपणे चालू आहे. मंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या प्रेरणेतून व अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही रक्तदान शिबिर  उत्साहात पार पडले.
यावर्षी 860 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सलग तिसऱ्या वर्षीही 800 च्या वर रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहकुटुंब येऊन रक्तदान केले. 
 मान्यवरांनी रक्तदानाच्या उपक्रमास येऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे,पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, माजी आमदार  प्रकाश आवाडे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे, उद्योजक सुरेंद्र जैन, प्रा. जयंत पाटील, नरेश चंदवानी, मुकुंद भावे ,डीवायएसपी सुप्रिया पाटील,एलसीबी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, अभियंता हर्षजीत घाटगे , माजी महापौर रामभाऊ फाळके, मयूरचे संजय पाटील,  शिवप्रसाद वंदुरे पाटील  शिवसेना उपनेते संजय पवार नगरसेवक अजित मोरे, विजय खाडे पाटील, संग्राम निकम, प्रशांत पोकळे उपस्थित होते.
 रक्तदान यशस्वी करण्यासाठी  सचिन साळोखे,  योगेश चिकोडे ,आशिष बामणे ,जयदीप मोरे, सौ मधुरिमा चिकोडे, अजिंक्य अहिरे, कृष्णा आतवाडकर,  सुमित पाटील , मुन्ना साने, तुषार पाटील, सिद्धू पिसे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes