महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
schedule15 Dec 25 person by visibility 205 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या घोषणा सोमवारी 15 डिसेंबर 2025:रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषदा होत आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या कार्यक्रम यावेळी जाहीर होणार आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे गेली पाच वर्षे अनेक ठिकाणी नगरसेवक नाहीत. महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग त्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आता महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे.