उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृशोक
schedule14 Oct 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे चेअरमन उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचे वडील बाळासाहेब गणपती चकोते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते.प्राथमिक शिक्षक म्हणून ३६ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते.अत्यंत मितभाषी, मनमिळावू स्वभावाचा होते. ते आप्पाजी या नावाने परिचीत होते. कै.बाळासाहेब गणपती आण्णा चकोते चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चकोते इंग्लिश स्कूल अत्यंत उत्कृष्टरित्या, नावारूपाला आणले आहे.चकोते स्कूलचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना ,मुलगी, जावई,नातवंडे असा परिवार आहे.गुरुवारी १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी पंचगंगा नदीघाट, नांदणी येथे सकाळी १० वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.