Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळ

schedule13 Oct 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी -: , ‘पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सध्याच्या काळात पदवीधरांचे हक्क, शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधीसाठी ठोस भूमिका घ्यायला हवे. परीक्षा आहे पण पेपर लिक आहे,  डिग्री आहे, मात्र नोकरी नाही. शेती आहे, मात्र  पाऊस आहे. निवडणूक आयोग आहे, पण त्यावर विश्वास नाही. एमपीएससी आयोग आहे, पण त्याचे वाभाडे कसे निघाले आपण पाहिले. एकंदरीत जी व्यवस्था आहे त्यावर गैरविश्वास नव्हे, शंका नव्हे तर अपयशी ठरलं आहे असं सर्वांच मत बनल आहे.आता या परिस्थितीतून पुढचं पाऊल टाकताना या निवडणुका होत आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.’असें आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धनजी सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व  हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचारार्थ मेळावा  झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे असे यावेळी सर्वांना आवाहन केले.  दरम्यान या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ऑनलाइनद्वारे मार्गदर्शन केले. पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांशी सवाद साधताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

 माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे. दोन्ही पक्ष मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश निश्चित आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू आणि सुसंस्कृत आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.’

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, ‘देशातील वातावरण बदलत आहे. बदलत्या वातावरणाचा अंदाज पहिल्यांदा पदवीधर आणि शिक्षकांना येतो. बदललेल्या वातावरणाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद पदवीधर आणि शिक्षक देतील आणि महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना विजयी करतील. त्या दोघांची कामाची पद्धत सरस आहे. विशेष परिश्रम घेतली तर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठया मताधिक्क्यांनी विजयी होतील.’

याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजीत कदम खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार  मोहन जोशी, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुशअण्णा काकडे, माजी आमदार तथा पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष श्रीमती दीप्ती चौधरी, गटनेते ॲड. चंदूशेठ कदम उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes