Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभपंडित उल्हास कशाळकर, युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखेंना गुणीदास पुरस्कार ! सहा डिसेंबरला वितरण समारंभ !!भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारा

जाहिरात

 

पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धार

schedule13 Oct 26 person by visibility 483 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या विविध प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठविण्याची भूमिका शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी स्पष्ट केली आहे. 

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी बोलताना शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी,‘‘शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी हा शिक्षकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारा, सरकार व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद साधणारा दुवा असावा. त्यामुळे तरुण, तडफदार आणि अभ्यासू असणाऱ्या कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक एक चे मत देऊन पहिल्या फेरीतच विजयी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी, ’

जुनी पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी लढत राहून शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची प्रसंगी लढा उभारण्याची कौस्तुभ गावडे यांनी ग्वाही दिली. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक व कर्मचारी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, संबंधित निर्णयप्रक्रियेत त्यांचा आवाज बुलंद करणे आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने सातत्यपूर्ण लढा देणे आवश्यक आहे. या भूमिकेतून जुनी पेन्शनचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्याचा निर्धारगावडे यांनी व्यक्त केला. यावेळी राहुल पोवार, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, संदीप पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, डॉ. डी. एस. घुगरे, एम. एन. पाटील, अनिल चव्हाण, मदन निकम, आनंदा चव्हाण, संजय डवर आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. 

…………….

 “शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. जुनी पेन्शन मिळविण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्याबरोबरच शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न, अशैक्षणिक कामांचा भार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार,”

 कौस्तुभ गावडे, उमेदवार शिक्षक मतदारसंघ पुणे विभाग

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes