Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडेपुणे पदवीधरमध्ये  उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष !  महायुतीकडून स्मिता जाधव,  महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजाशिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुक

जाहिरात

 

४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोल

schedule11 Oct 26 person by visibility 60 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘महायुतीचे नेते मंडळी ४४०० ठरावधारक आपल्याकडे असल्याचा डांगोरा पिटता, मग ठरावधारकांना शपथा कशाला घ्यायला लावता ? तुमचा कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? समविचारी आघाडीकडे १८०० ठराव आहेत, मात्र आम्ही कुणालाही शपथ घ्यायला लावणार नाही. शपथेच्या राजकारणात अडकू नका. महायुतीकडे सत्तेचा डोंगर आहे, आमच्याकडे स्वाभिमानी ठरावधारक आहेत.त्या दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही गोकुळची निवडणूक  लढवित आहे. ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेसाठी लढत नाही, तर गोकुळच्या अस्तित्वासाठी आमचा लढा आहे. कारण गुजरातमध्ये केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये सरदार पटेल डेअरी फेडरेशनची घोषणा झाली आहे. या फेडरेशनद्वारे गोकुळसह अन्य दूध संस्था एकत्र करण्याचा घाट घातल जात आहे. महायुतीतील नेते मुंबई आणि दिल्लीपुढे हतबल आहेत. यामुळे गोकुळ वाचविण्यासाठी समविचारी आघाडीला एकहाती सत्ता द्या.’असे आवाहन काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी केले.

गोकुळ दुध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ घटस्थापनेच्या दिनी झाला. गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या चुये येथील स्मारकाला अभिवादन करुन समविचारी आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार बजरंग देसाई, आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. आमदार पाटील यांनी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची ओळख करुन दिली.

चुये येथे झालेल्या प्रचार मेळाव्यात आमदार पाटील यांनी महायुतीच्या नेतेमंडळीचा खरपूस समाचार घेतला. ‘गोकुळवरुन गेल्या सहा महिन्यात झालेली महायुतीतील भांडणे म्हणजे नुरा कुस्ती होती. महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप केले, डोकी फोडली, भांडणे केली आणि सहा महिन्यांनी एकत्र आले. मग तुम्ही ठरावधारकांना, दूध उत्पादकांना का त्रास दिला ?’असा खडा सवाल करत आमदार पाटील यांनी महायुतीतील नेतेमंडळीच्याकडून घेतलेल्या शपथांचावरुन निशाणा साधला. ‘गेल्या निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील यांनी आणलेला भंडारा घेऊन आम्ही प्रमुख नेत्यांनी शपथा घेतल्या होत्या. पाच वर्षे एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मग पाच वर्षे आम्ही नेतेमंडळी एकत्र का राहिलो नाही याचे उत्तर द्यावे. ’असे आव्हान त्यांनी दिले.

आमदार पाटील म्हणाले ‘समविचारी आघाडी सत्तेत आल्यानंतर म्हैस दूध खरेदी दरात किमान पाच रुपये, गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करू. म्हैस खरेदीसाठी  जनावराच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, पशुखाद्याचा दर शंभर रुपयांनी कमी करणार आणि पाच वर्षात गोकुळचे दूध संकलन ३० लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. गोकुळचा निर्णय मुंबईतून होत असेल तर या जिल्ह्यातील शेतकरी, दुधउत्पादक आणि ठरावधारक कधीच मान्य करणार नाहीत. त्यामुळे येत्या 18 तारखेला जिल्ह्यातील सुजाण शेतकरी “शिट्टी” या चिन्हासमोर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व 25 उमेदवार निवडून देतील’

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. मात्र महायुतीच्या एकाही नेतेमंडळीत त्याला विरोध करण्याची हिंमत नाही. शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, हे मुख्यमंत्र्यांना सांगण्याची ताकत महायुतीमधील एकाही नेत्यांमध्ये नाही. गुजरातच्या लोकांची गुलामगिरी किती दिवस सहन करायची. गुजरातचे दोन नेते देश चालवित आहेत, आणि आणखी दोघे देश विकत घेत आहेत. महायुतीच्या हाती सत्ता गेली तर गोकुळ परावलंबी होईल. यामुळे समविचारी आघाडीकडे सत्ता द्या.’याप्रसंगी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळची मालकी दूध उत्पादकाकडे राहण्यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या. महायुतीकडे सत्ता आल्यास गोकुळला चार दरवाजे लागतील. किल्ल्या मुंबईला हलवतील.’याप्रसंगी माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार राजीव किसन आवळे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उमेदवार अभिजीत तायशेटे, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर यांची भाषणे झाली. उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उमेदवार विश्वासराव इंगवले, विद्याधर गुरंबे, सचिन घोरपडे, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगुले, विश्वजीत जाधव, सुभाष डोंगरे, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब देवकर, राहुल देसाई,सत्यजित पाटील,  उदय पाटील, दादासाहेब पाटील, सातार्डेकर, विकास पांडुरंग पाटील,  विशाल गोपाळराव पाटील, विश्वजीत रणजीतसिंह पाटील, शहाजी केशव पाटील, रणधीर मोरे, महिला गटातील उमेदवार भाग्यश्री डोंगळे, अंजना रेडेकर,  शशिकांत खोत, राजूबाबा आवळे आणि  बयाजी शेळके आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes