Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकसर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणा

जाहिरात

 

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधक

schedule10 Oct 26 person by visibility 121 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची या वर्षाची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह २३ संशोधक, प्राध्यापकांना मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या यादीत माजी संशोधक विद्यार्थ्यांनाही स्थान लाभले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आपले स्थान सातत्यपूर्ण पद्धतीने कायम राखले आहे. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. या यादीमध्ये विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), माजी प्र-कुलगुरू प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान), प्रा. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. ए.व्ही. राव (पदार्थविज्ञान), प्रा. संजय गोविंदवार (पदार्थविज्ञान), प्रा. चंद्रकांत भोसले (पदार्थविज्ञान), डॉ. आण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), प्रा. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. सचिन ओतारी (नॅनोतंत्रज्ञान), प्रा. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), प्रा. तुकाराम डोंगळे (इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (पदार्थविज्ञान), प्रा. विश्वास बापट (जैवतंत्रज्ञान), डॉ. नीलेश तरवाळ (पदार्थविज्ञान), प्रा. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. कृष्णा पवार (पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. याशिवाय, या यादीत डॉ. सचिन भालेकर (गणित), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थविज्ञान) आणि डॉ. शरदराव व्हनाळकर (पदार्थविज्ञान) या माजी विद्यार्थी, शिक्षकांचाही समावेश आहे.

करिअर परफॉर्मन्स अर्थात सार्वकालिक कामगिरीच्या यादीत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. केशव राजपुरे, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. चंद्रकांत भोसले, डॉ. संजय गोविंदवार, डॉ. विश्वास बापट यांचा समावेश आहे.

‘स्कोपस’ डेटाबेसवर आधारित ‘एल्सव्हिअर’ने तयार केलेल्या या यादीसाठी १९६० ते २०२६ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर विचार करण्यात आला आहे. २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमधील संशोधनाची दखल त्याअंतर्गत घेतली गेली आहे.

संशोधनातील सातत्यपूर्ण कामगिरीचे फलित

कुलगुरू राजनीश कामत :  शिवाजी विद्यापीठातील संशोधक सलगपणे दरवर्षी जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करीत आहेत. त्याला त्यांची सातत्यपूर्ण संशोधकीय कामगिरी कारणीभूत आहे. ही बाब विद्यापीठासाठी अत्यंत बहुमानास्पद असून नवसंशोधकांना प्रेरणा देणारी आहे. या सर्व संशोधकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यापुढील काळातही त्यांच्याकडून आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अशीच उज्जवल कामगिरी नोंदविली जावी, यासाठी त्यांना शुभेच्छाही देतो.'

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes