Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !

जाहिरात

 

महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीच

schedule06 Oct 26 person by visibility 52 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की बिनविरोध करणार अशा चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली होती. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी, सात ऑक्टोबर रोजी उमेदवारांची नावे जाहीर करू असे स्पष्ट करत बिनविरोधाच्या चर्चेला ब्रेक दिला. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी गोकुळच्या निवडणुकीत उतरली आहे. या आघाडीकडील उमेदवारांची नावे बहुतांशी निश्चित झाली आहेत. इच्छुक उमेदवार तालुकानिहाय दौरे करत आहेत. दुसरीकडे महायुतीचे नेते मंडळीमध्ये अजूनही जागा वाटपावरुन धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंबंधी बैठक झाली.  फॉर्म्युला ठरला. मात्र संख्याबळाच्या आधारे जागा हव्यात यासाठी नेत्यांचा आग्रह आहे.  महायुतीतील प्रत्येक  पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे महायुतीतील सगळया घटकांना जादा जागा हव्या आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवारांची घोषणा लांबली आहे. आता  गुरुवारी आठ तारखेला महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होईल. गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमातंर्गत आठ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उमेदवरी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आठ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes