Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!

जाहिरात

 

शक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !

schedule06 Oct 26 person by visibility 45 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून मंगळवारी, उमेदवारी अर्ज दाखल केला. माने यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. ‘कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेत गेल्या पंधरा वर्षांपासून सक्रियपणे काम करत असल्याचा दावा भैय्या माने यांनी केला. पदवीधरांची नोंदणी, त्यांच्या प्रश्नांसाठी केलेले काम आणि सातत्याने पदवीधरांशी असलेला संपर्क हीच आपली राजकीय ताकत आहे. सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष आहे.’असे  माने यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीकडून आपल्याला किंवा शरद लाड यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती, असे भैय्या माने यांनी सांगितले. मात्र अचानक नवीन नाव पुढे आल्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद लाड यांना अचानक उमेदवारीपासून डावलले जाणे, प्रवेश करूनही त्यांना संधी न मिळणे हे त्यांच्यासाठी निश्चितच धक्कादायक आहे.आपली भूमिका सध्या अपक्षाची असली तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याबद्दल सकारात्मक भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाष्य केले. अर्ज दाखल करत असताना “ दादांच्या मनातील आमदार “ हे फलक लक्षवेधी ठरत होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes