Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डदद

जाहिरात

 

गोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटील

schedule06 Oct 26 person by visibility 85 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीमध्ये एकवाक्यता नाही. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेत जागा वाटपावरुन चढाओढ दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना जादा जागा मिळाल्या नकोत यासाठी महायुतीतच प्रयत्न होत आहेत. यामुळेच बिनविरोध निवडणुकीचे पिल्लू सोडले आहे. मात्र गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पॅनेलचे उमेदवार बुधवारी, सात ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा आपण प्रचार करु. राजकारण वेगळे आणि नातेसंबंध वेगळे असतात. भाजपाला जर डॉ. ग. गो. जाधव व पी.डी. पाटील यांच्याविषयी इतके प्रेम होते तर त्यांनी राज्यपाल नियुक्त कोट्यातून डॉ. स्मिता जाधव यांना का आमदार केले नाही. भाजपचा राजकीय डाव काय आहे हे सगळयांना माहित आहे.असेही आमदार पाटील म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes